आई साठी काय लिहूआई साठी कसे लिहूआई साठी पुरतील एवढेशब्द नाहीत कोठेआई वरती लिहीण्याइतपतनाही माझे व्यक्तिमत्व मोठेजीवन हे शेत आई म्हणजे विहीरजीवन ही नौका तर आई म्हणजे तीरजीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटीजीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टीआई तू उन्हामधली सावलीआई तू पावसातली छत्रीआई तू थंडीतली शालआता यावीत दु:खे खुशालआई म्हणजे मंदिराचा उंच कळसआई म्हणजे अंगणातील पवित्र तुळसआई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणीआई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणीआई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळीआई म्हणजे वेदनेनंतरचीसर्वात पहिली आरोळी........अस्तित्वाचं इथे नांदणं आहेसंस्कारांच्या असंख्य चांदण्यांनीहृदयाच्या आभाळभर गोंदणं आहेआई, तुझ्या रागवण्यातहीअनूभवलाय वेगळाच गोडवातुझ्या मायेच्या नित्य नव्या सणातफिका पडतो दसरा नि पाडवाआठवतं तापाने फणफणायचो तेव्हांतू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीससर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरीतुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायचीएकदा जरासं कुठे खरचटलोआई, किती तू कळवळली होतीसएक धपाटा घालून पाठीतजख्मेवर फुंकर घातली होतीसजख्मं ती पुर्ण बुजली आताहरवून गेली त्यावरची खपलीतो धपाटा, ती फुंकर, ती मायाती हरेक आठवण मनात जपलीआई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेमहृद्याच्या किती कप्प्यात साठवू मीकितींदा नव्या हृदयाचा संदेशदेवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मीआई, हजार जन्म घेतले तरीएका जन्माचे ऋण फीटणार नाहीआई, लाख चुका होतील मज कडूनतुझं समजावनं मिटणार नाहीआई, करोडोंन मध्ये जरी हरवलोतरी तू मला शोधून काढशीलआई, तुला एकदाच हाक दिलीतरी अब्जांनी धावून येशील

0 comments:

Post a Comment

 

Copyright © 2009 जीवन गाणे Designed by csstemplatesmarket

Converted to Blogger by BloggerThemes.Net